पुण्यामध्ये आरटीई अंतर्गत पहिल्या टप्प्यात 36 हजार 933अर्ज; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

एमपीसी न्यूज – आरटीई अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून एकूण 36 हजार 933 ऑनलाईन अर्ज आले आहेत. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.

आरटीई अंतर्गत पहिल्या लॉटरी टप्प्यानुसार पुणे जिल्ह्यातून एकूण 36 हजार 933 ऑनलाईन अर्ज मिळाले आहेत. त्यानुसार आज अखेर 272 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या अंतर्गत शहरातील 849 खासगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये 15 हजार 693 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून पहिल्याच टप्प्यात 36 हजार अर्ज आले आहेत.

शिक्षण अधिकार 2009 अधिनियमाच्या (आरटीई) अंतर्गत नोंदणीकृत खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या 25 टक्के प्रवेशासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड हद्दीत 161 खाजगी शाळांची नोंदणी पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाकडे झाली असून ऑनलाईन पद्घतीने पालक या शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

या प्रवेश प्रक्रियेसाठी 9 केंद्र ठेवण्यात आली आहेत. यामध्ये बी. पी. मेमोरीयल स्कूल काळेवाडी, एम. एम. इंग्लिश मीडियम स्कूल थेरगाव, एस. पी. इंग्लिश स्कूल वाकड, किलबिल स्कूल पिंपळे गुरव, हॉरिझन इंग्लिश मीडियम स्कूल दिघी, संत साई इंग्लिश मीडियम स्कूल भोसरी, बीना इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी, कल्पना इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवड आणि एसबीपी स्कूल मोरवाडी या शाळांचा समावेश आहे.

राज्यशासनाने दिलेल्या ताराखांप्रमाणे 14 व 15 मार्चला दुसरा लॉटरी टप्पा 24 ते 25 मार्चला तिसरा टप्पा तर चौथा टप्पा 7 ते 8 एप्रिल आणि शेवटचा व पाचवा लॉटरी टप्पा 18 ते 20 एप्रिल या दोन दिवसात होईल, असे टप्पे पार पडणे अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.