Shirgaon News : अन त्याने भरदिवसा दुकानातून 36 हजार रुपयांचा किराणा डोळ्यासमोरून चोरला

एमपीसी न्यूज –  तो दुकानात गेला, त्याने पद्धतशीर लिस्ट दिली. थोडा-थोडका नाही तर 36 हजार रुपयांचा किराणा त्याने दुकानातील कामगाराच्या सहाय्याने (Shirgaon News) गाडीमध्ये भरला अन पैसे न देतो डोळ्यासोमरून माल घेऊन पळून गेला. हा प्रकार शिरगाव परंदवाडी येथे सोमवारी (दि.28) सकाळी आठ वाजता घडला आहे.

याप्रकरणी धनाजी राजाराम चव्हाण (वय 38 रा.परंदवाडी) या किराणा दुकान मालकाने अज्ञात चोरट्या विरोधात शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे परंदवाडी येथे स्वरा प्रोव्हीजन स्टोअर आहे. तिथे आरोपी सकाळी सकाळी त्याची लाल रंगाची सुझुकी ब्रिजा कार घेऊन आला. त्याने थोडा-थोडका नाही तर 36 हजार रुपयांचा किराणा दुकानातून घेतला. यावेळी दुकानात संभाजी गावडे हा कामगार होता.(Shirgaon News) त्याने किराणा आरोपीच्या कारमध्ये भरून दिला. त्यानंतर त्याने तुमचा कामगार माझ्या सोबत पाठवा मी त्याच्याजवळ पैसे देतो म्हणून सांगितले.

Thergaon News : महात्मा ज्योतिबा फुले हे पुरोगामी विचारांचे महान क्रांतिकारक – प्रकाश जाधव

तसे कामगार त्याच्या सोबत गाडीत बसून गेला देखील. थोड्या अतरांवर जाऊन त्यांने कामगाराला त्याचा फोन कॉल करण्यासाठी म्हणून मागितला व त्याने काही कारण काढत कामगाराला गाडी खाली उतरनू कामगाराचा माबाईल देखील घेऊन तो तेथून डोळ्या समोर पळून गेला.(Shirgaon News) विशेष म्हणजे या घाईत कोणी गाडीचा क्रमांक देखील पाहिला नाही. यावरून शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.