India Corona Update : 24 तासांत 36,635 जणांना डिस्चार्ज, 92.15 लाख झाले कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 36 हजार 635 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 92.15 लाखांवर पोहोचली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 94.65 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासांत 32 हजार 080 नव्या रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 97 लाख 35 हजार 850 एवढी झाली आहे. त्यापैकी 92 लाख 15 हजार 581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 3 लाख 78 हजार 909 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 402 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात 1 लाख 41 हजार 360 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे. देशात आतापर्यंत 14 कोटी 98 लाख 36 हजार 767 एवढे नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 10 लाख 22 हजार 712 नमूने मंगळवारी (दि.8) तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात नव्याने वाढ होणाऱ्या रुग्णांपैकी 53 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्र्चिम बंगाल व दिल्ली या राज्यातील आहेत. देशातील सक्रीय रुग्णांची निरंतर होणारी घट ही सकारात्मक बाब असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.