Pimpri: संगीत खुर्चीत महापौरांनी पटकाविला प्रथम क्रमांक; रस्सीखेचमध्ये आयुक्त संघाची बाजी 

675

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या संगीत खुर्चीत स्पर्धेत महापौर राहुल जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर, महापौर संघ विरुद्ध आयुक्त संघ या रस्सीखेच स्पर्धेत आयुक्त संघाने बाजी मारली. वर्धापनदिनानिमित्त रक्तदान, सायकल फेरी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. 

HB_POST_INPOST_R_A

महापालिकेच्या प्रांगणातील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर जाधव, सभागृह नेते  एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता  साने यांनी रक्तदान करून या शिबिराचा प्रारंभ केला. सुमारे 80 जणांनी रक्तदान केले.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या महापौर संघ विरुद्ध आयुक्त संघ या रस्सीखेच स्पर्धेत आयुक्त संघाने बाजी मारली. त्यानंतर झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत पुरूष गटात महापौर राहुल जाधव यांनी प्रथम तर बबन झिंजुर्डे यांनी द्वितीय आणि प्रमोद ओंभासे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यानंतर रंगलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये महिला पदाधिकारी, अधिकारी, कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

तत्पूर्वी सकाळी वर्धापननिमित्त पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी मनपा व सेफ किड्स संस्थेच्या सयुंक्त विद्यमाने चाफेकर चौक ते मनपा मुख्यालय अशी सायकल फेरी काढण्यात आली. त्याचे  उद्‌घाटन सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले. आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य सुरेश भोईर, नगरसदस्या अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्या 100 हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते.

यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौघुले, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘ह’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य शितल शिंदे, माऊली थोरात, बाबु नायर, केशव घोळवे, शैलेश मोरे, मोरेश्वर शेंडगे, नगरसद्स्या आरती चौंधे, निर्मला कुटे, निता पाडाळे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: