Khed News : खेड मध्ये 37 नवे कोरोना रुग्ण ; 40 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात बुधवारी  (दि. ४ ऑगस्ट ) 20 गावे आणि 3 पालिकांमध्ये 37 रुग्ण मिळून आले आहेत.  कोरोना श्रुंखला संपूर्णपणे खंडित होत नसल्याने अजूनही नागरिक काही प्रमाणात दहशतीत आहेत.  लसीकरण मोहीम, कायद्याच्या बडग्याने नियमांचं पालन होत असतानाही खेड कोरोना रुग्णांची संख्या का खंडित होत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. टेस्ट-ट्रेस-आयसोलेट या त्रिसुत्रीची अंमलबजावणी करण्यात पुरेसे यश न आल्यानेच अजूनही रुग्ण मिळून येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 552 झाला आहे. यापैकी 32 हजार 825 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात 40 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 246 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 481 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 29 रुग्ण, चाकण 2 , आळंदी 1, राजगुरुनगर 5vअसे एकुण 37 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
चांडोली ,होलेवाडी ,कडूस ,खरपुडी बु., मांजरेवाडी ,मरकळ ,मेदनकरवाडी , महाळुंगे , पिंपरी बु. , रोहकल, शिरोली , वरुडे , वासुली , येलवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे.  भोसे , चिंबळी, कडधे,काळेचीवाडी, खराबवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण ; तर दावडी मध्ये 5 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.