Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, गुरुवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत एकूण 64 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये झेंडे मळा येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर कॅन्टोमेंट बोर्डाचा एक कर्मचारीही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनातून बरे झालेल्या 37 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. तर मेन बाजारातील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. 22 सप्टेंबरला या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1116 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, गुरुवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत एकूण 64 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये झेंडे मळा येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर कॅन्टोमेंट बोर्डाचा एक कर्मचारीही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 1116 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 1011 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 76 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सध्या 10 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 32 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम आयसोलेशनमध्ये 33 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आज में बाजारातील एका जेष्ठ महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 30 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.