Chinchwad : ई-चलन मान्य नसलेल्या 373 जणांचे वाहतूक विभागाकडे अर्ज

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक विभागाकडून ई-चलनद्वारे कारवाई करण्यात येते. ई-चलनद्वारे झालेली कारवाई मान्य नसलेल्या 373 जणांनी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडे तक्रारी अर्ज केले आहेत. 16 फेब्रुवारी 2019 ते 26 फेब्रुवारी 2020 या कालावधीत हे अर्ज आले आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक शाखेसाठी MahaTrafficapp (महाट्रॅफिक अॅप) सुरु करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून 16 फेब्रुवारी 2019 पासून वन स्टेट, वन ई-चलन सुरु करण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर ई-चलन मशीनद्वारे कारवाई केली जात आहे.

ई-चलनच्या माध्यमातून करण्यात आलेली कारवाई मान्य नसल्यास नागरिक वाहतूक शाखेकडे तक्रार अर्ज करतात. 16 फेब्रुवारी 2019 ते 26 फेब्रुवारी 2020 या कालावधीत शहरातील 373 नागरिकांनी याबाबत अर्ज केले. त्यातील 238 अर्जांचे निवारण करण्यात आले आहे.

ई-चलन मशीनद्वारे करण्यात आलेले चलन मान्य नसल्यास 918448448960 या क्रमांकावर तसेच [email protected] या ई-मेलवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच MahaTrafficapp या अॅपवर आपल्या वाहनांवर झालेल्या ई-चलन कारवाईची माहिती घेता येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.