पुण्यातील क्लबमधील एकुण 38संघांचा सहभाग

‘सहावी शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धा

एमपीसी न्यूज – पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आयोजित सहाव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील एकूण 38 संघांमध्ये 500 हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे दि.4 मार्च 2017 पासून सुरू होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे म्हणाले की, क्लबचे माजी अध्यक्ष व टेनिसप्रेमी कै. शशी वैद्य यांच्या स्मरणार्थ  ही स्पर्धा सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेत एकूण 75 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला 40 हजार रुपये व करंडक, तर उपविजेत्या संघाला 15 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा प्लेट व एलाईट या गटात होणार असून  पुणे, पीसीएमसी आणि पुणे पूर्व (येरवडा) या तीन भागांत होणार आहे. याशिवाय एलाईट गटात गतवर्षीचे सहा संघ पात्र ठरले असून यावर्षीचे पुणे विभागांतील सहा संघ आणि पीसीएमसी व पुणे पूर्व (येरवडा) या भागातील प्रत्येकी दोन संघ, असे एकूण 16 संघ झुंजणार आहेत. एलाईट गटांतील दहा संघ प्लेट गटात खेळणार असल्याचे क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव हिमांशू गोसावी व स्पर्धेचे संयोजन सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले.

तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. दुहेरीचे 4 सामने खुल्या गटात होणार आहेत. दोन सामने 90 अधिक व 100 अधिक या गटात होणार आहेत. शहरातील हौशी टेनिस खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अरूण साने, डॉ.सुधीर भाटे, सुंदर अय्यर, हेमंत बेंद्रे, उत्सव मुखर्जी, जयंत कढे, नंदु रोकडे, राधिका तुळपुळे-कानिटकर आणि कौस्तुभ शहा यांचा सहभाग आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.