Pimpri : महापालिकेतील 38 अधिकारी-कर्मचारी निवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 38 अधिकारी आणि कर्मचारी जून 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांचा स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमासाठी उपमुख्य लेखापरीक्षक किशोर शिंगे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचा-यांना पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये लेखाधिकारी विजयकुमार इंगुळकर, मुख्याध्यापक उत्तरा कांबळे, चिंधा उंबरे, उपलेखापाल बाजीराव ओंबळे, कार्यालयीन अधिक्षक लतिका पारठे, श्रीकांत बेलसरे, शामराव भोसले, सहाय्यक शिक्षक निर्मला पठारे, उपशिक्षक विजय ओतारी, पद्मा कुंभारे, सुनंदा चव्हाण, मुख्य लिपिक निर्मला भालेराव, वाहनचालक मनोहर आरु, परमात्मा बनसोडे, बाळासाहेब कांबळे, असिस्टंट मेट्रन माया गायकवाड, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर बबन कोबल, रखवालदार सन्तु मराठे, दिलीप घुंडरे, राहुल गायकवाड, लिफ्टमन हसन शेख, शिपाई पंडित नाणेकर, सुरेश काकडे, वॉर्ड बॉय बाबु भूसाळे, मजूर सोन्याबापू गुजर, नागू केमसे, सफाई कामगार सावम्मा अनेपगोल, लाडबाई मोटा, ताराबाई पंचमुख, यशोदा सुर्यवंशी, गटारकुली मोहन डोळस, शिक्षिका अलका नेमाडे तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये सफाई कामगार निर्मला बहुले, शोभा खराडे, चंद्रभागा गवारे, गटार कुली विश्वनाथ माछरे, भारत जगजाप, ए.एन.एम. मार्गारेट साठे आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमात बोलताना विलास मडिगेरी म्हणाले, “सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचा-यांनी विविध ट्रस्ट, सामाजिक संस्था आदींच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय रहावे. तसेच विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी देऊन आपले निवृत्तीचे जीवन आनंदात जगावे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.