India Corona Update : गेल्या 24 तासांत देशभरात 38,164 नवे रुग्ण, 38,660 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 38 हजार 164 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 38 हजार 660 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णापैकी 3 कोटी 03 लाख 08 हजार 456 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 11 लाख 44 हजार 229 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 4 लाख 22 हजार 660 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.31 टक्के एवढा झाला आहे.

भारतात आजवर 4 लाख 14 हजार 108 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 499 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे. तर,

देशात आजवर 44 कोटी 54 लाख 22 हजार 256 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 63 हजार 593 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 40 कोटी 64 लाख 81 हजार 493 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.