BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेला लोणावळ्यातून 389 विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय अर्थिक दुर्बल घटक (एन एम एम एस) योजने अंतर्गत शिष्यवृती परीक्षा मावळ तालुक्यातील लोणावळा येथील व्ही पी एस शाळेत सुरळीत पार पडली. मावळातील पस्तीस शाळेतील 389 विद्यार्थांंनी ही परीक्षा दिली. विशेष म्हणजे यावर्षी नगरपालिका शाळेतील मुलांचा सहभाग वाढला आहे.

इयत्ता आठवीचे विद्यार्थी ही परीक्षा देतात व या परिक्षेत मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत प्रतिमहा 1000 रुपये शिष्यवृती दिली जाते.  या परिक्षेचे नियोजन व्ही पी एस शाळेचे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक संजीव रत्नपारखी, उपप्राचर्य मारुती तारु, उपमुख्याध्यापक विजय जोरी, पर्यवेक्षक डी.बी.कासार यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक वसंत बुरांडे, उज्वला पिंगळे, रामदास दरेकर यांनी केले होते.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3