Pune : जनसेवा बॅंकेचा ३८ वा वर्धापदिन उत्साहात 

समाजाच्या विकासासाठी कार्यरत असणा-या सेवावर्धिनी संस्थेस जनसेवा पुरस्कार प्रदान

एमपीसी  न्यूज – पुणे जिल्ह्यातील नामंकित जनसेवा सहकारी बॅंकेच्या ४८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त प्राज. इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार सेवावर्धिनी संस्थेच्यावतीने कार्यवाह सोमदत्त पटवर्धन व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. 

यावेळी बॅंकेचे अध्यक्ष सी.ए. प्रदीप जगताप, बॅंकेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरमेठ आदी सभासद, ग्राहक उपस्थित होते. प्रमोद चौधरी म्हणाले, आधुनिकतेकडून सहजता ही संकल्पना बॅंकेने आपल्या कृतीतून दाखवून दिली. नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार करीत दुस-या बाजूला समाजाची नेमकी गरज ओळखून त्याच्या प्रगतीसाठी झटणा-या संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची भूमिका पार पाडली. शाश्वत कार्य आणि विकास यांचा उत्तम समन्वय साधला जात असून पूर्वी श्रमदानांतून कामे केली जात अशा प्रकारच्या कामास बॅंकेने चालना दिली तर समाजास उपयोग होईल व पडद्यामागे राहून काम करणा-या संस्थाना उपयोग होईल.

सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सेवावर्धिनी संस्था गेली काही वर्षे काम करीत आहे. केवळ विकास काम नाही तर त्याबरोबर शिक्षणाची भूमिका पार पाडली जात आहे. त्यामुळेया पुरस्कारांमध्ये आमच्या संस्थेबरोबर अन्य  संस्थाचा सहभाग आहे. मुळांमध्ये सेवावर्धिनी संस्थेची संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनांतून निर्माण झाली आहे. आज त्याला व्यापक स्वरुप मिळाले आहे,  त्यामुळे आजचा हा पुरस्कार म्हणजे पाठीवरची आश्वासक थाप आहे.

बॅंकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी बॅंकेच्या सामाजिक कार्याची माहिती विषद करुन पुरस्कारामागची भूमिका व विविध उपक्रमांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र हिरेमठ य़ांनी केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.