Bhosari : रुग्णालयातील कॅन्सर विभागाचे संचालकपद देण्याच्या आमिषाने महिला डॉक्टरची 39 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – रुग्णालय चालविण्यास घेऊन त्याच्या कॅन्सर विभागाचे संचालक पद देण्याचे महिला डॉक्टरला आमिष दाखविले. तसेच अडचणीत असताना डॉक्टरकडून 24 लाख रुपये घेतले. डॉक्टरने केलेल्या शस्त्रक्रियांचा मोबदला दिला नाही. अडचणीच्या काळात घेतलेले आणि शस्त्रक्रिया केलेले अशी एकूण 39 लाख 16 हजार 651 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार भोसरी येथे 25 मार्च 2013 ते 22 फेब्रुवारी 2020 दरम्यान घडला.

या प्रकरणी एका डॉक्टर महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विद्याधर प्रभाकर सरफरे, अंजली विद्याधर सरफरे, मेडिकल फाउंडेशनच्या ट्रेझरर दीपाली विवेक चिंचोले व अकॉर्ड मेडिप्लस कंपनीच्या सेक्रेटरी मालविका मॉल (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांची संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल प्रा. लि. संत ज्ञानेश्वर मेडिकल फाउंडेशन ही संस्था अडचणीत असताना त्यांनी फिर्यादी यांच्याकडे रक्कम मागितली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी 24 लाख रुपये दिले होते. तसेच हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचे 15 लाख 16 हजार 651 रुपये, असे एकूण 39 लाख 16 हजार 651 रुपये रुग्णालयाकडून येणे अपेक्षित होते.

मात्र, आरोपी यांनी संगनमत करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने जुन्या कार्यकारी मंडळाकडून संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल व संत ज्ञानेश्वर मेडिकल फाउंडेशन हे हॉस्पिटल कराराव्दारे चालविण्यास घेतले. फिर्यादी यांना रुग्णालयातील कॅन्सर विभागाचे संचालक पद देण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यांची येणे बाकी असलेली 39 लाख 16 हजार 651 रुपये न देता आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.