India Corona Update : चोवीस तासांत 39,742 नवे कोरोना रुग्ण, 535 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या चोवीस तासांत 39 हजार 742 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 13 लाख 71 हजार 901 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांपैकी 3 कोटी 05 लाख 43 हजार 138 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 39 हजार 972 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 97.35 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 4 लाख 08 हजार 212 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 20 हजार 551 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 535 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 45 कोटी 62 लाख 89 हजार 567 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 18 हजार 756 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 43 कोटी 31 लाख 50 हजार 864 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 51 लाख 18 हजार 210 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.