Maharashtra News : मुंब्रा येथील रुग्णालयाला आग, 4 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : आज मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयाला (prime hospital) मध्यरात्री 3 वाजता भीषण आग लागली होती. या आगीचे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. तसेच या आगीत 4 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. रुग्णालयात 17 रुग्ण दाखल होते त्यातील 4 जणांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सदर आगीच्या घटनेत मृ्त्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींना देखील 1 लाख देण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.