Hinjawadi Crime News : हिंजवडी येथील बंगल्यातून 4 लाख 16 हजारांचे दागिने, रोकड चोरीला

घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील एका बंगल्यातून चोरट्याने चार लाख 16 हजरांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 17 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत विंडमिल व्हिलेज सोसायटी, बंगला नंबर सी 32 येथे घडली. याबाबत घरात काम करणा-या महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अमित राजेंद्र डांगरे (वय 40, रा. विंडमिल व्हिलेज सोसायटी, बंगला नंबर सी 32, ता. मुळशी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ विंडमिल व्हिलेज सोसायटी, बंगला नंबर सी 32 येथे राहतात. 17 नोव्हेंबर दुपारी दोन ते 4 डिसेंबर दुपारी तीन या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या बेडरूममधील लाकडी कपाटातून चार लाख 16 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्क्म चोरून नेली.

फिर्यादी यांचा संशय त्यांच्या घरात काम करणारी महिला ज्योती रमेश वरावटे हिच्यावर असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.