Corona Vaccination :  राज्यात शनिवारी 4 लाख 62 हजार नागरिकांनी घेतली लस 

देशातील सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात 

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने वेग घेतला असून शनिवारी (दि‌.03) एकाच दिवसात 4 लाख 62 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले. एकाच दिवसात एवढ्या उच्चांकी संख्येने लसीकरण करण्याची देशातील ही पहिलीच वेळ असून त्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला गेला आहे. 

देशात लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 73 लाख 54 हजार 244 जणांना लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 65 लाख 59 हजार 094 जणांना लसीचा पहिला डोस तर, 7 लाख 95 हजार 150 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

 

एक एप्रिलपासून देशात 45 वर्षांवरील सर्व जणांना लस दिली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 7 कोटी 59 लाख 79 हजार 651 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.