Pimpri: आणखी चार महिला पॉझिटिव्ह; सक्रिय रुग्णांची संख्या पोहचली 22 वर

एकाच दिवशी पाच जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू, आजपर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण, 12 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी)  एकाच दिवशी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दुपारी एकाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. तर, शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार महिलांचे  रिपोर्ट आता आले असून ते पॉझिटिव्ह आहेत. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 22 झाली आहे. त्यातील तिघांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, आज सायंकाळीच शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दरम्यान, आजपर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 12 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी (दि. 9) पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एका 41 वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट शनिवारी ‘पॉझिटीव्ह’ आले होते. आता या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील  चार महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सलग पाच दिवसांपासून कोरोना रुग्णाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येत आहेत. आज एकाच दिवशी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत.

पुण्यातील रुग्णालयात नोकरीला असलेल्या आणि पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या नर्सचे रिपोर्ट  शनिवारी पॉझिटिव्ह आले होते. या नर्सच्या पतीचे   रिपोर्ट  देखील  आज रविवारी दुपारी पॉझिटिव्ह आले होते. आता आणखी चार महिलांचे  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सायंकाळी शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.  त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.