Coronavirus : पिंपरी-चिंचवड मधील एका पोलीस निरक्षकासह आणखी चार पोलीस करोनाबाधित

4 Pimpri Chinchwad police personnel are corona virus positive, including a Police sub inspector. आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस कोरोनापासून दूर होते. मात्र, पिंपरी चिंचवड पोलीस दलात आता कोरोनाचा शिरकाव झाला असून एकूण सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.

पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेले पोलीस निरीक्षक आयुक्तालयातील एका विभागात कार्यरत आहेत. तर आयुक्तालयातील चार कर्मचारीही कोरोना बाधित झाले आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी (18 मे) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. या सहाय्यक निरीक्षकांच्या संपर्कात आल्याने एक पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे.

तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला 15 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस कोरोनापासून दूर होते. मात्र, पिंपरी चिंचवड पोलीस दलात आता कोरोनाचा शिरकाव झाला असून एकूण सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.