Jammu Kashmir : सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

0

एमपीसी न्यूज :  जम्मू काश्मीर भागात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांदरम्यान एक मोठी घटना घडल्याचं पाहायला मिळालं. ज्याअंतर्गत सुरक्षा दलासोबतच्या चकमकीमध्ये सदर प्रांतातील नगरोटा  भागात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालं.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टोल प्लाझापाशी गोळीबार झाल्याचं लक्षात येताच जम्मू काश्मीर राष्ट्रीय महारार्गावरी नगरोटा क्षेत्रातील वाहतूक बंद करण्यात आली. जम्मू जिल्हा पोलीस आयुक्त एसएसपी श्रीधर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी येथील सुरक्षा दलांवर बेछूट गोळीबार सुरु केला. येथे ते एका वाहनात लपलेले होते.

सदर कारवाईमुळं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तातडीनं थांबवण्यात आली. नगरोटा आणि उधमपूर भागात कोणत्याही वाहनास प्रवेशास बंदी घालण्यात आली.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी पुलवामा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केल्याचं वृत्त आहे. ज्यामध्ये 12 स्थानिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. काकापोरा भागात जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर निशाणा साधत हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. पण, निशाणा चुकला आणि ग्रेनेडचा रस्त्यावरच स्फोट झाला. ज्यानंतर हा परिसर सुरक्षा दलांनी ताब्यात घेत येथे शोधमोहिन सुरु केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III