Kasarwadi : भिंत कोसळून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कासारवाडी मधील जवळकर वस्तीतील यशवंत प्राईड वसाहतीमध्ये सीमा भिंत पडून एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली.

लोकेश ठाकूर (वय 4), असे या मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याची आई जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जवळकर वस्तीमधील यशवंत प्राइड वसाहतीमध्ये ड्रेनेजचे काम सुरू होते. यासाठी महापालिकेकडून चर खोदण्यात आले होते. मात्र, काम सुरू असताना वसाहतीची सीमा भिंत ढासळली. यावेळी भिंतीच्या शेजारी लहान मुले खेळत होती.  ही भिंत अचानक ढासळली. तिथून बाहेर जाण्यासाठी रस्ता नसल्याने लोकेशचा भिंती खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

 

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच स्थानिक नागरिकांनी पडलेली भिंत हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये गंभीर जखमी झालेल्या लोकेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच या घटनेमध्ये एक कामगार देखील जखमी झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.