Maval : जांभूळ ग्रुप ग्रामपंचायतीस 40 लाखांचा निधी

एमपीसी न्यूज – मावळ (Maval)  तालुक्यातील जांभूळ ग्रुप ग्रामपंचायतला विविध विकास कामांसाठी 40 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीमधून ही विकास कामे केली जाणार आहेत. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे.

Chinchwad : ग्लोब-टेक आयोजित इंजीनियरिंग एक्सपोची दारं सर्वांना खुली!

ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ यांना पुणे जिल्हा पालकमंत्री यांच्या निधीमधून व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून जांभूळ दलीत वस्त्तीस पाण्याची टाकी 15 लक्ष व भूमिगत गटार 10 लक्ष, अंतर्गत रस्ते 15 लक्ष असा भरघोस निधी उपलब्ध झाला.

सदर कामाचे भूमिपूजन भाजप अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, एस. आर. पी.अध्यक्ष बबनराव ओव्हाळ, जांभूळ गावचे आदर्श सरपंच नागसेन ओव्हाळ, विद्यमान उपसरपंच एकनाथ गाडे, ग्रामपंचायत सदस्या कल्पना काकरे, स्नेहल ओव्हळ, तृप्ती जांभूळकर, रुपाली गायकवाड, कुंदा खांदवे, माजी सरपंच संतोष जांभूळकर, अमित ओव्हाळ, योगेश जांभूळकर, रामदास पोटवडे, अमोल धिडे, बाळकृष्ण काकरे, दत्तात्रय जांभूळकर, महेंद्र ओव्हाळ, भास्कर ओव्हाळ इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान उपसरपंच एकनाथ गाडे यांनी केले. जांभूळ, मावळ  (Maval) ग्रामपंचायतीने पुणे जिल्हा पालकमंत्री व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे विशेष आभार व्यक्त केले. सर्व मान्यवरांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Todays Horoscope 27 May 2023 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य – आजचे पंचांग –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.