Chakan News : खेड मध्ये ४० रुग्ण, १ मृत्यू ; १०३ रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात बुधवारी  (दि. 28) 13 गावे आणि 3 पालिकांमध्ये 40 रुग्ण मिळून आले आहेत. तर  वाफगाव येथील 82 वर्षीय पुरुषाचा डी वाय पाटील हॉस्पिटल येथे बुधवारी मृत्यू झाला असल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

बुधवारी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 306 झाला आहे. यापैकी 32 हजार 590 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. दिवसभरात 103 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 236 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी एका मृत्यूने 480 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 27 रुग्ण, चाकण 6, आळंदी 1, राजगुरुनगर 6 असे एकुण 40 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे- आंबेठाण, खराबवाडी,मेदनकरवाडी,नाणेकरवाडी, संतोषनगर, शिवे, वडगाव घेनंद या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. चऱ्होली खु. , कनेरसर व वाकी खु. मध्ये प्रत्येकी २ रुग्ण ,  वाफगाव व दावडी मध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आणि महाळुंगे मध्ये 8 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.