Pimpri News : महापालिका शाळेतील 40 टक्के मुले साधनांअभावी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील 40 टक्के मुले साधनांअभावी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर  आहेत. महापालिका शाळेतील विद्यार्थी तंत्रस्नेही नाहीत. त्याकडे प्रशासनही लक्ष देत नाही. महापालिकेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना टॅब खरेदी करण्यासाठी तीन वेळा प्रस्ताव दिला. परंतू टॅब खरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची दयनीय अवस्‍था सर्वश्रृत आहे. महापालिकेच्या शहरी भागातील शाळांपेक्षा ग्रामीण भागातील शाळांमध्ये परप्रांतीय,परभाषिक, परराज्यातील, गरीब- एमआयडीसी कामगार, मजूर यांची मुले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने स्मार्ट फोन घेता येत नाही. त्यामुळे मुले ऑनलाइन शिक्षणापासून दूरच आहेत. मुले, शिक्षक टेक्नोसॅव्ही नाहीत.

दोन वर्षाच्या काळात सर्वांपर्यंत शिक्षण ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पोहोचविण्याचा, गरीब मुलांपर्यंत समाजमाध्यमातून,सोशल मीडियातून, शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण प्रशिक्षणे दिली. त्यासाठी अनेक शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केला. सर्व अधिकारी व पदाधिकारी जिल्हा परिषद, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) कडील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून पहिले आहे. यानंतर अजूनही शिक्षणापासून वंचित गरीब मुलांसाठी प्रशासन, शासनाकडून सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम (सीएसआर) संस्थांकडून मुलांना टॅब मिळण्यासाठी अनेक शिक्षकांनी प्रयत्न केला आहे.  कोरोनामुळे आठवी पर्यंतच्या शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबची अतिशय गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने खरेदी करावी अशी मागणी केली जात आहे.

सर्वांना शिक्षणासाठी टॅब आवश्‍यक असून तो मुलांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका शिक्षण समितीची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.