Talegaon : पीसीईटी नूतन बोट जॉब फेअरमध्ये चारशे उमेदवारांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (एनसीईआर) येथे आयोजित केलेल्या पीसीईटी नूतन बोट जॉब फेअर 2019ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे बोर्ड ऑफ अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग (बोट), मुंबई व महाराष्ट्र ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान तळेगाव येथे आयोजित केलेल्या अप्रेन्टिसशिप आणि रोजगार भरती मेळाव्यात महाराष्ट्रातून सुमारे 3000 विद्यार्थ्यांनी सदर मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती.

पुणे जिल्ह्यातील पस्तीस कंपन्यांनी या विनामूल्य जॉब फेअरमध्ये 400 विद्यार्थांची रोजगारासाठी निवड केली. तसेच 250 विदयार्थांना अंतिम मुलाखतीचे पत्र देण्यात आले, अशी माहिती पीसीईटी -नूतन संस्थेच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता आणि महाराष्ट्र ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.

या जॉब फेअरचे उद्‌घाटन बोटचे उपसंचालक एन. एन. वडोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नूतनचे विश्वस्त राजेश म्हस्के, अधिष्ठाता प्रा.शितलकुमार रवंदळे, बिजू सोना, प्राचार्य जीवन पाटील, प्रा. विजय नवले, प्रा. विजय टोपे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. सायली पुजारी, प्रा. महेश देशमुख, प्रा. श्रीधर शरनप्पा आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात जीई, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा ऑटोकॉम्प, फोर्स मोटर्स, झेड. एफ. इंडिया, युरेका फोर्ब्स, अल्फा लावल, महिंद्रा अँड महिंद्रा, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, सिग्मा, ऍडवीक हायटेक, मॅग्ना, एक्सल टेक, धूत, अशा पस्तीस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी अभियांत्रिकी पदवी आणि पदविका धारकांच्या मुलाखती घेऊन 400 विद्यार्थ्यांची निवड केली.

या मेळाव्याचे आयोजन पीसीईटी आणि नूतन ग्रुपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व विश्वस्त, ज्ञानेश्वर लांडगे, पद्मा भोसले, कृष्णराव भेगडे, संजय भेगडे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, भाईजान काझी, संतोष खांडगे, राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.