Chikhali : पूर्णानगर येथील योग दिन कार्यक्रमात 400 नागरिकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – जागतिक योग दिनानिमित्त एकनाथदादा पवार युवा मंचच्या वतीने पूर्णानगर येथील शनिमंदिर मैदानावर योगसाने व प्राणायामांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये परिसरातीलस सुमारे 400 नागरिकांनी सहभाग घेत योगसाने व प्राणायमाचे प्रात्याक्षिके केली. तसेच यावेळी वृक्षवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात 300 वृक्ष वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नगरसेविका अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे, उद्योजक संजय नेवाळे, संदीप मांगवडे, राजू वायसे, विजय घोडके, सुनील डोमाटे, सारिका पवार, कविता हिंगे, सुनीता जगताप, बाळासाहेब गंगावने ,भाजप उपाध्यक्ष गंगाधर मांडगे, तात्या भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

एकनाथदादा पवार युवा मंचच्या वतीने जागतिक योगदिनानिमित्त योगसाने व प्राणायामासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तज्ञ योग गुरू रवींद्र बराटे आणि संदीप आल्हाट यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, मुद्रा, आसन, ध्यान याचे प्रात्याक्षिके करून दाखविली, उपस्थितांना योगा अभ्यासाविषयी माहिती दिली.

एकनाथ पवार म्हणाले, ”योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासने व प्राणायाम आवश्यक आहे. योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन’ हा केवळ एका दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस न राहता आपल्या सगळ्यांची दैनंदिन योगाकडे वाटचाल घडवणारा ठरायला हवा”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.