Pune : छायाचित्रातून महात्मा गांधींचा जीवन प्रवास जाणून घेण्याची तरुणांना संधी (व्हिडिओ)

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 400 दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 400 दुर्मिळ छायाचित्रांचे सात दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले. हे प्रदर्शन दोन ठिकाणी भरविण्यात येणार असून सोमवार 1 आक्टोबरपासून तीन ऑक्टोबरपर्यंत बालगंधर्व कलादालन येथे तर 4 ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत कोथरूड येथील गांधी भवन येथे होणार आहे.

गांधी स्मारक निधी या संस्थेच्या साहाय्याने हे प्रदर्शन उभे केले असून छायाचित्रे मिळवण्यासाठी त्यांनी खूप सहकार्य केले आहे. या छायाचित्रांतून गांधीजींचा जीवनप्रवास सर्वांच्या समोर विशेषतः तरुणांसमोर यावा या दृष्टीने सर्व छायाचित्रे मिळवण्यात आली आहेत.

महात्माजींच्या बालपणापासून, वेगवेगळ्या चळवळींचे तसेच प्रवासाचे, आंदोलनाचे, मिठाचा सत्ताग्रह, ते त्यांच्या अंत्यविधी पर्यंतचे जवळपास सगळी छायाचित्रे यात आहेत. तरुणांनी येऊन गांधीजींचा जीवनप्रवास पाहून गांधींच्या विचाराचा अभ्यास करण्यास सुरुवात करावा, असा यामागील उद्देश आहे. या प्रदर्शनाचे संयोजन नितीन शास्त्री यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.