Chakan News : मेदनकरवाडी मधील शाळेतून संगणकासह 40 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या स्टाफरूम मधून दोन संगणक आणि अन्य साहित्य असा एकूण 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही गह्त्ना रविवारी (दि. 11) पहाटे उघडकीस आली.

शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला शांताराम पिंगळे (वय 52) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडी येथील कन्या विद्यालय या शाळेत फिर्यादी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. लॉकडाऊन असल्याने त्यांची शाळा कुलूप लाऊन बंद आहे.

शनिवारी (दि. 10) दुपारी दोन ते रविवारी (दि. 11) पहाटे पावणेसहा या कालावधीत शाळेचे गेट वाकडे करून स्टाफरूमचे कुलूप कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शाळेतून दोन संगणक, यूपीएस सिस्टम, इन्व्हर्टर बटरी, सीपीयू सिस्टम, वायफाय अडाप्टर असा एकूण 40 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.