Pune News : अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी 40:40:20 चा फाॅर्म्युला, विद्यापीठाचा परिक्षा आराखडा जाहीर

पुणे विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने होणार

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेचा आराखडा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये, यासाठी 60 प्रश्नांपैकी 40 टक्के सोपे, 40 टक्के मध्यम तर उर्वरित 20 टक्के प्रश्न अवघड असणार आहेत. तर, बहुपर्यायी प्रश्न उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत असताना अंतिम परीक्षेतील नमुना प्रश्नांवर आधारित सराव परीक्षा मुख्य परीक्षेच्या आधी दोन वेळा घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने होणार आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइनचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिले आहेत त्यांची परीक्षा 1 ऑक्टोबर पासून सुरू होईल, तर नियमित परीक्षा 10 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. ही परीक्षा एका तासाची आणि 50 गुणांची असेल. विद्यार्थ्यांना 60 प्रश्न दिले जाणार असून, 50 अचूक प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ‘एमसीक्यू’ परीक्षेमुळे कमी गुण मिळतील किंवा अनुत्तीर्ण होईल, अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जावी, यासाठी 40 टक्के सोपे प्रश्न, 40टक्के अवघड आणि 20 टक्के कठीण प्रश्न असणार आहेत.
ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ईमेल व मोबाईलद्वारे सर्व माहिती दिली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर सुरक्षेचे सर्व नियम पाळून, ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन (ओएमआर) शीट उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यावरून त्यांना एमसीक्यू प्रश्न सोडवायचे आहेत, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
– जे विद्यार्थी ऑफलाइन, ऑनलाइन परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र परीक्षेचे आयोजन अंतिम वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षांसाठी 13 मार्च पर्यंत
– शिकवलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा अंतिम पूर्व वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होतील.
_MPC_DIR_MPU_II
– दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 मिनिटे जास्तींचा वेळ दिला जाईल
-ऑफलाइन व ऑनलाइन एमसीक्यू परीक्षेमुळे उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची प्रत मिळणार नाही.
– अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय अभ्यासक्रमनिहाय समन्वयकांची नियुक्ती करणार
– परिक्षेचे वेळापत्रक www.unipune.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.