Maharashtra Corona Update : चिंता वाढली ! दिवसभरात राज्यात 40,414 नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – राज्यातील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढवत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. हि वाढ राज्यातील आजवरची सर्वाधिक रुग्ण वाढ असून, कोरोनाची साखळी आणखी घट्ट होताना दिसत आहे.  

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 23 लाख 32 हजार 453 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दिवसभरात 17 हजार 874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले असून ते सध्या 85.95 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 3 लाख 25 हजार 901 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येता येणार नाही.

 लॉकडाऊनची तयारी करा ; तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी, दि.28) टास्क फोर्सकडून राज्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन केले नाही तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपविण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.