India Corona Update : चिंताजनक ! गेल्या 24 तासांत 40,953 नवे कोरोना रुग्ण, 188 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 40 हजार 953 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 188 मृत्यू झाले. या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 55 हजार 284 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 11 लाख 07 हजार 332 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 23 हजार 653 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 2 लाख 88 हजार 394 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 188 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 59 हजार 558 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.38 टक्के एवढा आहे‌. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.25 टक्के एवढं झाले आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांत नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 23 कोटी 24 लाख 31 हजार 5170 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 10 लाख 60 हजार 971 चाचण्या शुक्रवारी (दि.19) रोजी करण्यात आल्या आहेत.

चार कोटी नागरिकांचे लसीकरण 
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 4 कोटी 20 लाख 63 हजार 392 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून, यामध्ये 60 वर्षांवरील तसेच 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.