Pimpri : शहरातील 41 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

दिवसभरात 42 जणांना कोरोनाची लागण. 41 more persons test positive to coronavirus. These covid19 patients are from Anandnagar, Sangvi, Thergaon, Dehuroad area.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल आज, रविवारी (दि. 24) सायंकाळी आला आहे. रविवारी सकाळी भोसरी येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दिवसभरात शहरातील एकूण 42 जणांना लागण झाली आहे.

रविवारी दिवसभरात एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. शनिवारी शहरात 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

पिंपरी चिंचवड शहरातील आनंदनगर चिंचवड, सांगवी, थेरगाव, देहूरोड परिसरातील 41 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 30 पुरुष आणि 11 स्त्रियांचा समावेश आहे. तर शहराच्या बाहेरील रहिवासी असलेले परंतु पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू असलेली चार पुरुष कोरोना बाधित झाले आहेत.

शहरात आजवर 354 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 170 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 155 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेरील रहिवासी असलेले परंतु पिंपरी चिंचवड शहरात दाखल केलेल्या 29 जणांवर उपचार सुरू आहेत. तर शहराच्या बाहेरील रहिवासी असलेल्या 9 जणांचा पिंपरी चिंचवड शहरात मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेल्या 22 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.