India Corona Update : गेल्या 24 तासांत 41,280 जणांना डिस्चार्ज, 1.14 कोटी रुग्ण कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 41 हजार 280 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 14 लाख 34 हजार 301 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 94.11 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 53 हजार 480 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 21 लाख 49 हजार 335 एवढी झाली आहे. देशात सध्या 5 लाख 52 हजार 566 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत 354 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 62 हजार 468 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे‌.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 24 कोटी 36 लाख 72 हजार 940 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 10 लाख 22 हजार 915 चाचण्या मंगळवारी (दि. 30) करण्यात आल्या आहेत.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 6 कोटी 30 लाख 54 हजार 353 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.