India Corona Update : गेल्या 24 तासांत 41,506 नवे रुग्ण, 41,526 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत 41 हजार 506 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत तर, 41 हजार 526 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 08 लाख 37 हजार 222 एवढी झाली आहे. 

देशातील एकूण कोरोना रुग्णापैकी 2 कोटी 99 लाख 75 हजार 064 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 54 हजार 118 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.20 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

भारतात आजवर 4 लाख 08 हजार 040 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 43 कोटी 08 लाख 85 हजार 470 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 18 लाख 43 हजार 500 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 37 कोटी 60 लाख 32 हजार 586 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 37 लाख 23 हजार 367 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.