India Corona Update : 24 तासांत 41,810 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 94 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून देशात दररोज चाळीस हजाराच्या आसपास नवे रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 41 हजार 810 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 94 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 93 लाख 92 हजार 920 एवढी झाली आहे. त्यापैकी 88 लाख 02 हजार 267 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 53 हजार 956 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात मागील 24 तासांत 42 हजार 298 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 93.71 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 1 लाख 36 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे. देशात आतापर्यंत 13 कोटी 95 लाख 3 हजार 803 एवढ्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, मागील 24 तासांत देशभरात 12 लाख 83 हजार 449 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात (5,965), दिल्लीत (4,998), केरळ (6,250), पश्चिम बंगाल (3,459) तर, राजस्थानमध्ये (2,765) नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. देशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक 89 हजार 905 सक्रिय रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.