Pune News : पुण्यात 42 वर्षीय महिलेवर बलात्कार, 53 वर्षीय व्यापारी अटकेत

एमपीसी न्यूज : पुण्यातील दोन व्यापाऱ्यांनी 40 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील चार वर्षापासून हे कृत्य सुरू होते. कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून या दोन व्यापाऱ्यांना अटक केली आहे. 

भरत जेठमल गांधी (वय 53) आणि दिलीप पुष्कराज ओसवाल (वय 53) अशी अटक करण्यात आलेल्या दोन व्यापाऱ्यांची नावे आहेत. 42 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या दोघांवर बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत गांधी हा सोन्याचा व्यापारी तर दिलीप ओसवाल हा धान्याचा व्यापारी आहे. पीडित महिला आरोपींचा ओळखीची आहे. ही महिला पतीसोबत राहत नसल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी तिच्यासोबत वेळोवेळी गैरकृत्य केलं. कोरेगाव पार्क, शिवाजीनगर येथील आरोपीच्या कार्यालयात तर शुक्रवार पेठेतील एका फ्लॅटमध्ये या दोघांनी तिच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केला.

दरम्यान फिर्याद आल्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.