Bhosari : इंद्रायणीनगर येथे 42 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – भोसरीमधील इंद्रायणीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

मछिंद्र रमेश पाटील (वय 38, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांचे घर बुधवारी (दि. 19) रात्री आठ ते शुक्रवारी (दि. 21) रात्री बारा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल असा एकूण 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.