India Corona Update : गेल्या 24 तासांत 42,625 नवे रुग्ण, 36,668 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 42 हजार 625 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 36 हजार 668 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 09 लाख 33 हजार 022 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 17 लाख 69 हजार 132 एवढी झाली आहे. देशात सध्या 4 लाख 10 हजार 353 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आजवर 4 लाख 25 हजार 757 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 562 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे. तर, रिकव्हरी रेट 97.36 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात आजवर 47 कोटी 31 लाख 42 हजार 307 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 18 लाख 47 हजार 518 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 48 कोटी 52 लाख 86 हजार 570 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 62 लाख 53 हजार 741 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.