Pimpri: शहरात आज 427 नवीन रुग्णांची भर, 145 जणांना डिस्चार्ज, 10 जणांचा मृत्यू

427 persons tested positive for coronavirus today in Pimpri Chinhcwad, 10 covid19 deaths reported. आज एकाचदिवशी दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

एमपसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या विविध भागातील 409 आणि शहराबाहेरील 18 अशा 427 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 145 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 6958 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. चिंचवडमधील 78 वर्षीय वृद्ध, चिखलीतील 75 वर्षीय वृद्ध, रुपीनगर मधील 47 वर्षीय महिला, पिंपळेगुरुवमधील 66 वर्षीय पुरुष, पिंपरीगावातील 62 वर्षीय पुरुष, पिंपरी 76 वर्षीय वृद्ध, पिंपरीतीलीच 65 वर्षीय पुरुष, कासारवाडीतील 60 वर्षीय पुरुष अशा शहरातील आठ जणांचा तर शहराबाहेरील देहुरोडमधील 79 वर्षीय वृद्धाचा आणि टिंगरेनगर मधील 66 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 6958 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3994 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 102 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 36 अशा 138 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2505 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 646

# पॉझिटीव्ह रुग्ण – 427

#निगेटीव्ह रुग्ण – 462

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 2157

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2315

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1319

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 6958

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 2505

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 138

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 3994

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 19859

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 62276

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.