Chakan News : खेड मध्ये 43 नवे कोरोना बाधित रुग्ण ; 2 मृत्यू 44 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात मंगळवारी (दि. 27) 22 गावे आणि 2 पालिकांमध्ये 43 कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत.  तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कुरुळी येथील 72 वर्षीय महिलेचा डी वाय पाटील हॉस्पिटल येथे, तर कडूस येथील 74 वर्षीय पुरुषाचा पोखरकर हॉस्पिटल मंचर येथे मृत्यू झाला असल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे. चाकण मध्ये मागील काही दिवसांत प्रथमच 24 तासात एकही नवीन रुग्ण मिळाला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

मंगळवारी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 266 झाला आहे. यापैकी 32 हजार 487 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात 44 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 300 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 2 मृत्यूने 479 एवढा झाला आहे.

सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 37 रुग्ण, चाकण 0, आळंदी 1, राजगुरुनगर 5 असे एकूण 43 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-

बहुळ , भोसे,चांडोली ,चिंबळी, जऊळके बु. , खराबवाडी , कुडे ,मेदनकरवाडी, निघोजे , पिंपरी बु. ,टाकळकरवाडी, वरची भांबुरवाडी,वासुली या गावांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण मिळाला आहे. मोई , नाणेकरवाडी ,  कडूस ,कनेरसर ,कुरुळी , शेलपिंपळगाव, वरुडेया गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळाले आहेत.
चऱ्होली खु. मध्ये 3 तर महाळुंगे मध्ये 7 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.