Pune Covishield Vaccine Update : कोव्हिशिल्डचे 438 लाभार्थी ; तर 32 लोकांनी दिला नकार 

एमपीसी न्यूज : देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभांरभाच्या पहिल्या टप्प्यात पुण्यातील महापालिका आणि खासगी रुग्णालयातील 8 केंद्रांवर लसीकरण झाले. यामध्ये एकूण 800 पैकी 438 जणांनी कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली तर 32 जणांनी नकार दिला. 

लसीकरण मोहीमेचे औपचारीक उद्घाटन काल म्हणजे शनिवारी (दि.16 जानेवारी) सोहळा पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात संपन्न झाला. महापालिका आणि खासगी मिळून 8 रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 100 प्रमाणे 800 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाला सुरूवात झाली.

पुण्यात राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ, ससून रुग्णालय, पुणे स्टेशन, सुतार दवाखाना, कोथरूड, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा (खासगी), रूबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता (खासगी), नोबल हॉस्पिटल, हडपसर (खासगी), भारती हॉस्पिटल, धनकवडी (खासगी) या 8 ठिकाणी रुग्णालयांमध्ये लसीकरण पार पडले.

या संदर्भात पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती म्हणाले, लसीकरण मोहीमेअंतर्गत 8 लसीकरण केंद्रांमध्ये एकूण 800 लाभार्थी पैकी 470 हजर झाले. त्यापैकी 32 लोकांनी साईट वर येवून लस घेण्यास नकार दिला. दिवसभरात एकूण 438 लाभार्थ्यांना कोविशिल्ड ही लस दिली गेली. सुदैवाने पुण्यामध्ये एक ही अप्रिय घटना घडली नाही, असे समाधान त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.