Talegaon Dabhade : जागरुक वाचक कट्टाच्या मागणीला यश; तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर लागणार 44 सीसीटीव्ही कॅमेरे

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोहमार्गावर असलेल्या तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी जागरुक वाचक कट्टाचे उपाध्यक्ष दिलीप डोळस आणि सहसचिव अमित प्रभावळकर यांनी तळेगाव रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे केली होती. त्या मागणीला यश आले असून स्टेशनवर 44 सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जागरुक वाचक कट्टाकडून तळेगाव रेल्वेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. तळेगाव दाभाडे हे पश्मिम रेल्वेच्या पुणे मुंबई दरम्यानचे एक महत्वाचे स्टेशन आहे. या स्टेशनवर एक्सप्रेस आणि लोकल अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या थांबतात. दररोज हजारो प्रवासी या स्टेशन वरून येजा करत असतात. सध्या कोरोना मुळे थोडीशी रहदारी कमी असली तरी हळूहळू सर्व बाबी सुरू होणार आहेत. प्रवाशांची संख्या देखील वाढणार आहे. असे असूनही या स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

अनेक वेळा एकट्या महिला आणि इतर प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांच्या जानमालाच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत गरजेचे आहे. तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन आणि परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, असे निवेदनात म्हटले होते.

त्यावर रेल्वे विभागाकडून जागरूक वाचक कट्टाच्या प्रतिनिधींना पत्र पाठवण्यात आले. त्यात स्टेशनवर 44 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.