-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chakan News : खेड मध्ये ४५ नवे कोरोना रुग्ण ; १ मृत्यू ,२२ रुग्णांना डिस्चार्ज

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात मंगळवारी (दि. २० ) १६ गावे आणि ३ पालिकांमध्ये ४५ रुग्ण मिळून आले आहेत.  तर चिंबळी येथील ७० वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मंगळवारी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा ३२ हजार ९५२ झाला आहे. यापैकी ३२ हजार १८५ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात २२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत २९६ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी एका मृत्यूने ४७१ एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात ४२ रुग्ण, चाकण १, आळंदी १, राजगुरुनगर १ असे एकुण ४५ नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
आंबेठाण, बिरदवडी ,गारगोटवाडी, कडाचीवाडी ,किवळे ,कोयाळी,कुरकुंडी, नाणेकरवाडी, शिरोली या गावांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण मिळाला आहे. कडूस मध्ये २ रुग्ण, चिंबळी ,खालुंब्रे, कनेरसर मध्ये प्रत्येकी ३ रुग्ण करंजविहीरे मध्ये ४ रुग्ण , शेलपिंपळगाव मध्ये ८ तर महाळुंगे मध्ये १० नवे रुग्ण मिळून आले आहेत.

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn