Pimpri : पालिकेच्या दत्तक योजनेसाठी 45 खेळाडू पात्र; सहा खेळाडू ठरले अपात्र

एमपीसी न्यूज – क्रीडा विकासाच्या उद्दिष्टासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या खेळाडू दत्तक योजनेसाठी 45 खेळाडू पात्र ठरले आहेत. तर, सहा खेळाडू अपात्र ठरले आहेत. पात्र खेळाडूंना महापालिका योजनेचा लाभ देणार आहे.

महापालिकेतर्फे शहरातील खेळाडूंना दत्तक घेण्यात येते. याअंतर्गत खेळाडूंना तंत्रशुद्ध आवश्यक साहित्य, सुविधा, प्रोत्साहनात्मक मानधन दिले जाते. यामध्ये दहा खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन, रायफल, शुटिंग, जलतरण, कुस्ती, बॉक्सिंग, मैदानी खेळ, खो-खो, रोलर स्केटिंग या खेळासाठी योजना राबविण्यात येते. नऊ सदस्यीय समिती खेळाडूंची निवड करते.

सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने दत्तक योजनेसाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी एकूण 51 खेळाडूंनी अर्ज केले होते. त्यापैंकी 45 खेळाडूंचे अर्ज पात्र ठरले असून सहा जणांचे अपत्र ठरले आहेत. या पात्र खेळाडूंना पालिका योजनेचा लाभ देणार आहे.

दरम्यान, महापालिकेने सन 2013-14 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली. तेव्हापासून 224 खेळाडूंनी या योजनेचा लाभ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.