Nigdi : निगडीत 45 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – रूमच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रूममधील चार मोबाईल, रोकड असा 45 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना निगडीतील साईनाथनगर येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.

समाधान राजेंद्र कदम (वय-25, रा. अण्णाभाऊ साठे सभागृहा जवळ, साईनाथ नगर, पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. रूममधील चार मोबाईल, रोकड, बँकेचे कागदपत्रे असा 45 हजार 300 रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार कोकाटे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.