Chakan News : कंपनीच्या गोडावूनमधून 46 लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गोडाऊनच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधून 45 लाख 99 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 10 जुलै रोजी खेड तालुक्यातील खराबवाडी येथे लुमॅक्स अॅन्सीलरी लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमध्ये उघडकीस आली.

शिवानंद रामदास फलके (वय 35, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद फलके खराबवाडी येथे असलेल्या लुमॅक्स अॅन्सीलरी लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमध्ये काम करतात. अज्ञात चोरट्यांनी 29 जून ते 10 जुलै या कालावधीत गोडाऊनच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. गोडावूनमधून कॉपर वायर, ब्रास टर्मिनल असे एकूण 45 लाख 99 हजार 968 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.