Chakan News : खेड मध्ये नवीन ४६ रुग्ण ; ३६ डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात गुरुवारी (दि. 29 ) 23 गावे आणि 3 पालिकांमध्ये 46 रुग्ण मिळून आले आहेत. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 352 झाला आहे. यापैकी 32 हजार 626 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात 36 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 246 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा 480 एवढा आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 37 रुग्ण, चाकण 5, आळंदी 3, राजगुरुनगर 1 असे एकुण 46 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
बिरदवडी, चऱ्होली खु.,चिंबळी ,दावडी ,ढोरे भांबुरवाडी ,गोलेगाव , खरपुडी खु. ,वासुली ,वेताळे, वाफगाव, महाळुंगे ,मिर्जेवाडी, रेटवडी,साबुर्डी ,सोळू, वडगाव घेनंद या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे.  कडूस, खराबवाडी ,वाकी खु., निमगाव, बहुळ या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळाले आहेत. संतोषनगर मध्ये 4 रुग्ण ; तर कोयाळी मध्ये 6 रुग्ण मिळून आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.