Pune Crime : पुण्यात भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून लुटले तब्बल 47 लाख

एमपीसी न्यूज : पुण्यातील नाना पेठेत दिवसाढवळ्या तरुणांनी व्यापाराला लुटल्याची घटना घडली आहे. नाना पेठेतील आझाद आळी मधून टू व्हीलर वरून आलेल्या दोघांनी कोयता (Pune Crime) दाखवून पैश्याने भरलेली पिशवी पळवली. भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून तब्बल 47 लाख रुपये लुटण्यात आले.या घटनेनंतर तात्काळ समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकी वर जात असताना नाना पेठ येथील आजाद आळी मधून बाहेर येतात दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन या व्यापाऱ्याला अडवले.

 

Chikhali News : श्री गजानन बाल संस्कार केंद्राच्या वतीने गुढीपाडवा नव वर्षाचे स्वागत

 

गाडीवरून उतरून त्या दोन तरुणांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी ही घेऊन ते दोघेही पसार झाले. (Pune Crime) व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल 47 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.