Pimpri : आयुक्तालयातील 48 सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 48 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 23) काढले. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये नऊ सहाय्यक पोलीस निरीक्षक पैकी एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 39 पोलीस उपनिरीक्षक पैकी 13 महिला पोलीस उपनिरीक्षक यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्या विविध पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, वाहतूक विभाग, अतिक्रमण विभाग, महिला कक्षामध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी प्रशासकीय कारणास्तव या बदल्या केल्या आहेत. सध्या आयुक्तालयाला मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळाच्या आधारावर आयुक्तालयातील विविध शाखांची सुरुवात करायची आहे. तसेच पोलीस ठाण्यातील मनुष्यबळाकडे देखील लक्ष द्यायचे आहे. यामुळे आयुक्तालयाची मनुष्यबळाच्या बाबतीत तारेवरची कसरत होत आहे. त्यातच आयुक्तांनी मंगळवारी आयुक्तालयातील 16 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्याचबरोबर 48 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.