Dehuroad : बांधकाम व्यावसायिकाकडून वीटभट्टी व्यावसायिकाची 48 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वीटभट्टी व्यावसायिकाकडून बांधकामासाठी विटा घ्यायच्या आणि त्या बदल्यात वीटभट्टी व्यावसायिकाला एक फ्लॅट देण्याचे ठरले. मात्र ठरल्याप्रमाणे फ्लॅट न देता वीटभट्टी व्यवसायिकाची 47 लाख 80 हजार रुपयांची बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक केली. हा प्रकार मार्च 2016 साली देहूरोड येथे घडला.

महेश शिवाजी राऊत (वय 30, रा. मामुर्डी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश पुंडलिक शिरोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश शिरोडे हा बांधकाम व्यवसायिक आहे. त्याची भूमी क्रिएशन ही कंपनी आहे. तर महेश यांची वीटभट्टी आहे. सुरेश याने महेश यांच्या वीटभट्टीवरून त्याच्या बांधकाम साईटसाठी लागणाऱ्या विटा घेतल्या. या विटांच्या बदल्यात सुरेश हा महेश यांना त्याच्या भूमीवर ओराबेल या इमारतीमध्ये एक फ्लॅट देणार असल्याचे ठरले. मात्र, ठरल्याप्रमाणे सुरेश याने महेश यांना फ्लॅट न देता त्यांच्याकडून घेतलेल्या विटांचे एकूण 47 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.